योमिंग : रिपब्लिकन पक्षाकडून सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना योमिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत येथे मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे, तर हा पराभव म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रिपब्लिकनच्या उमेदवारीसाठीची ट्रम्प यांची घोडदौड रोखताना रिपब्लिकनचे उमेदवार सिनेटर टेड क्रूज आणि मार्को रुबियो यांनी योमिंग व वॉशिंंग्टनमधून ट्रम्प यांचा पराभव केला. यात क्रूज यांना ९ प्रतिनिधींचे समर्थन मिळाले, तर रुबियो यांना १० प्रतिनिधींचे समर्थन मिळाले. यानंतर आता फ्लोरिडा, ओहायो, इलिनोइस, मिसौरी आणि नॉर्थ कॅरोलिना येथे १५ मार्चला मतदान होणार आहे. रिअल इस्टेट व्यवसायी ६९ वर्षीय ट्रम्प हे तरीही सध्या सर्वात पुढे आहेत. त्यांच्याजवळ सर्वात जास्त ४६० प्रतिनिधी आहेत, तर क्रूज यांच्याकडे ३६७ व रुबियो यांना १५३ प्रतिनिधींचे समर्थन आहे. ओहायोचे राज्यपाल जॉन कासिच यांना ५३ प्रतिनिधींचे समर्थन आहे. पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होण्यासाठी एकूण २४७२ प्रतिनिधींपैकी १२३७ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक आहे. तो तर इसिसचा समर्थक ओहियोत एका कार्यक्रमात ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान एका आंदोलकाने थेट व्यासपीठावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हा आंदोलक म्हणजे इसिसचा समर्थक असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ओहियोतील डायटन शहरात ही घटना घडली. ट्रम्प यांच्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध काही आंदोलक आंदोलन करीत होते. यावेळी ट्रम्प यांचे समर्थक व या आंदोलकांत बाचाबाची झाली. ट्रम्प तर खोटारडे डोनाल्ड ट्रम्प हे खोटारडे आहेत, अशी टीका आज डेमोक्रॅटिक पक्षाचे एक दावेदार बर्नी सँडर्स यांनी केली. रिपब्लिकनचे एक उमेदवार ट्रम्प यांनी सँडर्स यांच्यावर आरोप केला होता की, शुक्रवारी शिकागोतील रॅलीत हिंसक प्रदर्शनामागे सँडर्स यांचा हात होता.
योमिंग, वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प पराभूत
By admin | Published: March 13, 2016 11:14 PM