शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भविष्य नाकारणाऱ्या राष्ट्रांत ट्रम्प सहभागी

By admin | Published: June 03, 2017 1:27 AM

अमेरिकेचे जागतिक नेतृत्व बाजूला सारून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्य नाकारणाऱ्या मूठभर राष्ट्रंत सहभागी झाले आहेत, अशा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे जागतिक नेतृत्व बाजूला सारून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भविष्य नाकारणाऱ्या मूठभर राष्ट्रंत सहभागी झाले आहेत, अशा शब्दात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हवामान बदलाच्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ओबामा म्हणाले की, जे राष्ट्र पॅरिस कराराशी जोडले गेलेले आहेत त्यांना नोकऱ्या आणि उद्योगात लाभ होणार आहे. मला वाटते की, अमेरिकेने या करारात सर्वांत पुढे असायला हवे. दीड वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये जगातील देश एक आले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जगाच्या संरक्षणासाठी एक करार करण्यात आला. ओबामा यांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की, वैज्ञानिक, इंजिनिअरिंग यांच्यासाठी पॅरिस कराराने संधीचे दरवाजे खुले केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की, अमेरिका हवामान बदलाच्या पॅरिस करारातून बाहेर पडत आहे. अमेरिकेसाठी हा योग्य निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसचे माजी संपर्क संचालक जेन साकी यांनी हा निर्णय विनाशक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आम्ही वचन दिले होते. जगातील प्रत्येक दुसरे सरकार या कराराच्या मागे खंबीरपणे उभे होते. व्यावसायिक आणि नागरिकांत हा करार लोकप्रिय होता. आमच्या पुढच्या पिढीसाठी त्यामुळे भविष्य निश्चित झाले होते. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्या एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत १२ टक्के वेगाने वाढत आहेत. उर्वरित जगात आमच्या संबंधासाठी हा निर्णय चुकीचा आहे. (वृत्तसंस्था)ट्रम्प म्हणाले, कराराचा लाभ भारताला१९० पेक्षा अधिक देश सहभागी असलेल्या या कराराचा अधिकाधिक लाभ भारत आणि चीनला होत आहे, असे मत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, अमेरिकेच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग आणि रोजगारावर याचा वाईट परिणाम झाला आहे. या करारामुळे भारताला अब्जावधी डॉलर मिळणार आहेत. भारताला पर्यावरण संरक्षणाची पाच हजार वर्षांची परंपरा : मोदी सेंट पिटर्सबर्ग (रशिया) : भारताला पर्यावरण संरक्षणाची पाच हजार वर्षांची परंपरा आहे, असे सांगतानाच पर्यावरण संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पॅरिस करारातून माघार घेणाऱ्या अमेरिकेचा थेट संदर्भ टाळून मोदी म्हणाले की, पर्यावरणाबाबतची आमची बांधिलकी भविष्यातील पिढ्यांसाठी फायदेशीर आहे. त्याआधीच्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, निसर्गाचे शोषण आम्हाला मान्य नाही.