शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 9:17 AM

व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनानं थैमान घातलेला असून, अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.अमेरिकेत कोरोना संक्रमित आणि मृतांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत पसरलेला हा कोरोना व्हाइट हाऊसमध्ये जाऊन पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

वॉशिंग्टनः जगभरात कोरोनानं थैमान घातलेला असून, अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित आणि मृतांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत पसरलेला हा कोरोना व्हाइट हाऊसमध्ये जाऊन पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात व्हाइट हाऊसनं एक निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या नौदलातील ही व्यक्ती असून, ती राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होती. खबरदारी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची  कोरोना चाचणी करण्यात आली असून, ती निगेटिव्ह आली आहे. आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प कुटुंबात वैयक्तिक नोकर म्हणून काम करणाऱ्या अमेरिकन सैन्यातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचीही चाचणी घेण्यात आली असून दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असंही व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली व्यक्ती ही सैन्याच्या एका एलिट युनिटचा भाग आहे, जी राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाची सेवा करते. असे नोकर बहुतेक वेळा राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या अगदी जवळ काम करतात. व्हाइट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. ही व्यक्ती कोठून संक्रमित झाली हेही तपासले जात आहे. संसर्ग झालेली व्यक्ती राष्ट्रपतींच्या वैयक्तिक कामात मदत करत होती. राष्ट्रपतींच्या अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. ते बहुतेक वेळा त्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्षांसोबत असतात. या व्यक्तीमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची लक्षणं आढळून आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. तेव्हा तिला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले. अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या