अमेरिकन काँग्रेसनं डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकीकडे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं असून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. जो बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मतं मिळाली. तसंच २० जानेवारी रोजी आपण सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचंही ट्रम्प यांनी गुरूवारी सांगितलं. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्रात औपचारिक पद्धतीनं राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयानंतर काही वेळानं आपण शांततेत सत्तेचं हस्तांतरण करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. "या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या उत्तम कार्यकाळाचा शेवट झाला आहे. अमेरिकेला पुन्हा मोठं करण्यासाठी आमच्यासाठी ही संघर्षाची सुरूवात आहे," असंही ट्रम्प यावेळी म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं वक्तव्य केलं.
अखेर ट्रम्प यांनी स्वीकारला पराभव; बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब
By जयदीप दाभोळकर | Published: January 07, 2021 4:31 PM
या घोषणेपूर्वी सकाळी ट्रम्प समर्थकांकडून संसेदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार
ठळक मुद्देयापूर्वी संसंदेच्या परिसरात घडला होता हिंसाचार२० जानेवारीला जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा