शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

महिलांविषयीच्या विधानांनी ट्रम्प अडचणीत

By admin | Published: October 09, 2016 12:23 AM

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे २00५ मधील आपल्याच एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. या व्हिडिओबद्दल

वॉशिंगटन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे २00५ मधील आपल्याच एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. या व्हिडिओबद्दल त्यांना जाहीर माफीही मागावी लागली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या हाती हा व्हिडिओ लागल्यानंतर व्हायरल झाला. त्यात ट्रम्प महिलांविषयी म्हणतात की, ‘मी त्यांचे थेट चुंबन घ्यायला सुरुवात करतो. फक्त चुंबन. मी अधिक वाट पाहू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्टार असता, तेव्हा त्या तुम्हाला हवे ते करू देतात.’७0 वर्षीय ट्रम्प यांचा हा व्हिडीओ बिली बुश यांच्याशी बोलतानाचा आहे. ‘डेज आॅफ अवर लाइव्ज’ या शोमध्ये टीव्ही पाहुणे कलाकार म्हणून ट्रम्प यांच्याशी ही बातचीत करण्यात आली होती. या व्हिडीओमुळे अमेरिकेत हलकल्लोळ उडाला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने माफीचे निवेदन जारी केले. त्यांनी म्हटले की, हे बंद दाराआड झालेले खाजगी संभाषण आहे. बिल क्लिंटन यांनी यापेक्षा फार वाईट शब्द वापरले आहेत. तेही उघडपणे. यामुळे कोणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. (वृत्तसंस्था)1ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी लगेच टीकेची झोड उठविणारे निवेदन केले. त्या म्हणाल्या की, ‘हे खरोखरच भयंकर आहे. आम्ही अशा माणसाला राष्ट्राध्यक्ष होण्याची परवानगी देऊ शकत नाही.’ डेमॉक्रॅटिक पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार टीम केन यांनी म्हटले की, अशा प्रकारचे वर्तन घाणेरडे आहे.2नंतर ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवर दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ लोड करण्यात आला. त्यात ते म्हणतात की, मी सर्वगुणसंपन्न आहे, असा दावा मी कधीच केला नाही. हा व्हिडीओ दशकभरापूर्वीचा आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. अमेरिकेपुढील समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असे व्हिडीओ उकरून काढले जात आहेत. आमच्या नोकऱ्या हातून निघून चालल्या आहेत. आम्ही असुरक्षित झालो आहोत. वॉशिंगटन तर कोलमडून पडले आहे. बिल क्लिंटन यांनी यापेक्षा भयंकर कृत्ये केली आहेत. त्यांनी महिलांना अवमानित केले. त्यांचे शोषण केले. त्यांना धमकावले. येणाऱ्या रविवारच्या चर्चेत हे सगळे समोर येईलच, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.