शहरं
Join us  
Trending Stories
1
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली अॅम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
4
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
5
Team India Arrival LIVE: टीम इंडियाचे 'हार्दिक' स्वागत; रोहितसेनेला पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर
6
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
7
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
8
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांचा घणाघात
9
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
10
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
11
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
12
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
14
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
15
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
16
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
17
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
18
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
19
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
20
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video

ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार; इवांका यांनी स्वीकारलं मोदींचं निमंत्रण

By admin | Published: June 27, 2017 9:56 AM

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी भारतात यावं,असं आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिलं आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 27-  डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते. सोमवारी रात्री उशीरा साधारण 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी भारतात यावं,असं आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिलं आहे. त्यांनी ते स्वीकारलं असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपतींनी सहकुटुंब भारतात येण्याचं मी त्यांना निमंत्रण देतो, त्यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे, असं म्हणत मोदींनी ट्रम्प यांनाही निमंत्रण दिलं. ट्रम्प यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं असून अजून नेमकी तारीख नक्की झालेली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर इवांका ट्रम्प यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले.  भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकतेचं नेतृत्व करण्यासाठी मला भारतात येण्याचं  निमंत्रण दिलं, यासाठी धन्यवाद, असं ट्विट इवांका ट्रम्प यांनी केलं आहे.
 
सोमवारी रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी  मेलेनिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केलं. व्हाइट हाउसमध्ये प्रवेश करताना त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. या वर्षी भारत स्वातंत्र्यांचं 70 वं वर्ष साजरं करणार आहे, याबाबत मी भारताच्या जनतेचं अभिनंदन करतो. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारावेळी मी भारत अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं होतं आणि ते खरं ठरलं आहे, असं म्हणतं डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. 
तसंच द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान पंतप्रधान असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, मोदी महान पंतप्रधान आहेत, माझं त्यांच्यासोबत बोलणं होत असतं, मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे,  त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.
पंतप्रधान मोंदींनी ट्रम्प परिवाराला दिलेलं आमंत्रण इवांका यांनी स्वीकारलं आहे पण भारतात ट्रम्प परिवार कधी येणार याची तारीख निश्चित झालेली नाही.