वॉशिंग्टन, दि. 3 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या इमिग्रेशन पॉलिसीची घोषणा केली. या पॉलिसीनुसार इतर देशांतील लोकांना मेरिटच्या आधारावर अमेरिकेच्या वास्तव्याचा दाखला मिळणार आहे. जर ट्रम्प यांचा हा प्रस्ताव अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये पास झाला, तर याचा सरळ सरळ भारतासमवेत इतर देशांना फायदा होणार आहे. या अॅक्टला Reforming American Immigration for Strong Employment (RAISE), असं म्हटलं जातं. या पॉलिसीमुळे लॉटरी सिस्टीम संपणार असून, पॉइन्ट बेस्ड सिस्टीम सुरू होईल. त्याप्रमाणेच इंग्रजी चांगलं बोलणं, शिक्षण आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचा मुद्दा गृहीत धरला जाणार आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून या अॅक्टची घोषणा केली. ट्रम्प म्हणाले, या अॅक्टमुळे गरिबी कमी होईल, तसेच कर भरणा-या लोकांचा पैसाही वाचेल, या माध्यमातूनची दुस-या देशांतील लोकांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळेल. या अॅक्टमुळे जुनी व्यवस्था समाप्त होईल आणि पॉइन्ट बेस्ड सिस्टीम सुरू होईल. या अॅक्टची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांना ग्रीन कार्ड मिळणं सोपं जाणार आहे. ज्यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, जे लोक स्वतःचा खर्च उचलण्यासाठी सक्षम आहेत आणि स्वतःच्या कौशल्याच्या आधारावर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात, त्यांना याचा फायदा होणार आहे. या नव्या पॉलिसीमुळे अमेरिकेतील कर्मचा-यांशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. आता अमेरिकेत कोणीही सहजरीत्या येऊन पैसे कमावू शकणार नाही, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. तुमच्या जवळ स्किल असेल तरच तुमचा अमेरिकेत निभाव लागणार आहे.H1B व्हिसावर ट्रम्प यांचा कठोर पवित्रा गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार होती. या व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. ‘बाय अमेरिका, हायर अमेरिका’ या धोरणानुसार ट्रम्प यांनी आपला आदेश काढला होता. या आदेशाचा भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असल्याचे जाणकारांनी सांगितले होते. विस्कोन्सिनमधील केनोशा येथे स्नॅप ऑन इंक कंपनीच्या मुख्यालयात ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली होती. हा अध्यादेश लागू झाल्याने आता अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावे लागणार आहे. तत्पूर्वी त्यांनी तेथे एका सभेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, सध्या लॉटरी पद्धतीने एच-१बी व्हिसा दिले जात आहेत. हे चूक आहे. त्याऐवजी सर्वाधिक कुशल आणि वेतनधारी लोकांना हे व्हिसा दिले जायला हवेत. अमेरिकी नागरिकांना नोकऱ्या नाकारण्यासाठी व्हिसाचा गैरवापर होता कामा नये.
ट्रम्प यांच्या नव्या इमिग्रेशन पॉलिसीमुळे भारतीय IT प्रोफेशनल्सला होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 12:00 PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या इमिग्रेशन पॉलिसीची घोषणा केली. या पॉलिसीनुसार इतर देशांतील लोकांना मेरिटच्या आधारावर अमेरिकेच्या वास्तव्याचा दाखला मिळणार आहे.
ठळक मुद्देमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या इमिग्रेशन पॉलिसीची घोषणा केली.पॉलिसीनुसार इतर देशांतील लोकांना मेरिटच्या आधारावर अमेरिकेच्या वास्तव्याचा दाखला मिळणार आहेइंग्रजी चांगलं बोलणं, शिक्षण आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचा मुद्दा गृहीत धरला जाणार आहे.