गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अडकले आहेत. त्यांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने प्रयत्न सुरू केले आहेत. आज क्रू-10 हे यान लाँच होणार होते. पण, आता पुन्हा एकदा ही मोहिम थांबवण्यात आली आहे. याआधी नासाने १३ मार्चपर्यंत सुनीता विल्यम्स यांना परत आणणार असं जाहीर केलं होतं.
पाकिस्तान सरकारकडे उरले फक्त २४ तास, त्यानंतर...; ट्रेन हायजॅकर्स BLA चा अल्टिमेटम
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानंतर अखेर पृथ्वीवर परतण्याची तयारी करत आहेत. त्यांचे मिशन फक्त दहा दिवस चालणार होते, पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे ते जवळजवळ दहा महिने लांबले.
तांत्रिक समस्येमुळे प्रक्षेपण रद्द करण्यात आले तेव्हा मोहीम सुरू होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक होते, असे नासाने सांगितले. नासाच्या प्रक्षेपण समालोचक डारोल नेल यांनी सांगितले की, जमिनीवरील हायड्रॉलिक सिस्टीममध्ये समस्या होती. रॉकेट आणि अंतराळयानामध्ये सर्व काही ठीक आहे.
नासा-स्पेसएक्स क्रू-10 मोहिमेला घेऊन जाणारे फाल्कन ९ रॉकेट बुधवारी संध्याकाळी ७:४८ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून उड्डाण करणार होते. क्रू-9 हे अंतराळयान, जे आता आयएसएसवर डॉक केले आहे, ते क्रू-10 वाहून नेणारे अंतराळयान आल्यानंतरच पृथ्वीवर परत येऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही आश्वासन दिले होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनाही दिली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, बायडेन यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात सोडले आहे. याबद्दल माझ आणि एलॉन मस्क यांच बोलण झाले आहे.