वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व अबाधित राखले आहे. तर अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा मुसंडी मारली असून बहुमतासाठी त्यांना केवळ 14 जागांची गरज आहे. हा ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये 435 जागांपैकी 391 जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. ट्रम्प यांच्या पक्षाला 187 जागा तर डेमॉक्रेटीक पक्षाला 204 जागा मिळाल्या आहेत. अद्याप 44 जागांचा निकाल येणे बाकी असून डेमॉक्रेटीक पक्षाला बहुमतासाठी केवळ 14 जागांची गरज आहे. दोन्ही सदनांमध्ये गेल्या 84 वर्षांत केवळ तीनवेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्य झाले आहे.