ऑनलाइन लोकमत
पाम बीच फ्लोरिडा, दि. 2 : सायबर हॅकिंगबाबत रशियाला दोषी धरणे चुकीचे आहे. खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने संगणक सुरक्षित नाही, असे सांगत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संगणकावर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले. अनेक देश ‘आॅनलाइन’ची कास धरत असताना, अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या अध्यक्षांनीच आॅनलाइन संपर्कप्रणालीच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त केला आहे.
ट्रम्प हे टिष्ट्वटरच्या माध्यमातून संपर्क साधत असले, तरी ते क्वचितच ई-मेल आणि संगणकाचा वापर करतात. एका कार्यक्रमात त्यांनी आॅनलाइन संपर्कप्रणालीच्या सुरक्षिततेवर संशय व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘तुमच्याकडे काही महत्त्वाची वा गोपनीय माहिती असेल, तर ती स्वत: लिहून ती टपालामार्फत पाठवावी. कारण कोणतीही संगणकप्रणाली खासगी माहितीच्या दृष्टीने सुरक्षित नाही.’