डेन्व्हर : डेन्व्हर येथील तीन किशोरवयीन मुली इसिस किंवा इस्लामिक स्टेट आॅफ सिरिया अँड इराक या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय असून, त्यांची एफबीआयकडून कसून चौकशी केली जात आहे. एफबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या तीन मुलींना जर्मनीत पकडण्यात आले असून, त्याना डेन्व्हर येथे आणण्यात आले आहे. प्रवक्ता सुझी पायने यासंदर्भात बोलताना म्हणाल्या की, या मुली सुरक्षित असून, त्याना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. या मुलींचे नाव वा ओळख देण्यात आलेली नाही. डेन्व्हर येथील १९ वर्षीय शॅनन कोनले या युवतीवर सिरियात दहशतवाद्यांना मदत करीत असल्याचा आरोप असून, तिला दोषी ठरविण्यात आले आहे, त्यानंतर महिनाभराने हे प्रकरण उघडकीस आले आहे. (वृत्तसंस्था).
इसिससाठी पळून जाण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 23, 2014 4:44 AM