अलास्का : कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या अमेरिकेवर आता त्सुनामीचे नवे संकट दाटू लागले आहे. अलास्काच्या किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सुरक्षित स्थळी निघण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी 1.5 ते 2 फूट उंच त्सुनामीच्या लाटाही उठल्या होत्या. यामुळे खबरदारी म्हणून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना देण्यात आली.
या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 41 किमी खाली सँड पॉईंट शहरापासून 94 किमी दूर होता. त्सुमाचा धोका असल्याचे केनेडी एन्ट्रन्सपासून युनिमॅक पासपर्यंत देण्यात आला आहे. नॅशनल ओशिऐनिक अँड अटमॉस्फीरिक ऐडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने सांगितले की, दुपारी जवळपास 5 वाजता (ईस्टर्न स्टँडर्ड टाईम) 7.4 तीव्रतेचे धक्के जाणवले. अलास्का भूकंप मापन केंद्रानुसार एकूण तीन भूकंपाचे झटके जाणवले. यापैकी नंतरचे दोन हे 5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होते.
भूकंप आणि त्सुनामीच्या प्रभावाखाली येणाऱ्या भागातील नागरिकांना त्सुनामीची सूचना देण्यात आली. नॅशनल वेदर सर्विसच्या लोकांनी सांगितले की, मोठ्या ताकदीच्या लाटा आणि कंरटचा परिणाम समुद्र किनारी दिसू शकतो. यामुळे लोकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून दूर राहणे आणि उंच भागात जाऊन आसरा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यानंतर तेथील लोक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी घरातून निघाले. सँड पॉईंटच्या काही भागात त्सुनामीच्या छोट्या लाटा दिसल्या. मात्र, नंतर NOAA ने सूचना सावधानतेच्या इशाऱ्यामध्ये बदलली. तसेच या त्सुनामीच्या मोठ्या लाटांची शक्यता कमी झाल्याचे व मोठे नुकसान होणार नसल्याचे सांगण्यात आले.