वॉशिंग्टनः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेकांना त्याची बाधा झाली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गबार्ड यांनीही कोरोनाच्या संकटात एक उपाय सुचवला आहे. या कठीण काळात भगवद्गीतेमध्ये तुम्हाला निश्चितता, सामर्थ्य व शांती मिळू शकेल, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हवाई इथून काँग्रेसच्या खासदार असलेल्या ३९ वर्षीय गबार्ड यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं, त्या म्हणाल्या की, या संकटकाळात भगवद्गीता वाचणं आवश्यक आहे. उद्याचे काय होईल हे कुणालाही निश्चितपणे सांगता येणार नाही.कृष्णाने भगवद्गीतेत शिकवलेल्या भक्ती योग आणि कर्मयोगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला निश्चितता, सामर्थ्य व शांती मिळते, असे गबार्ड विद्यार्थ्यांना म्हणाल्या. अमेरिकेमध्ये आफ्रिकन-अमेरिकन माणूस जॉर्डन फ्लॉयडच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर निषेध व्यक्त होत असताना त्यांनी असं विधान केल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. हिंदू विद्यार्थी परिषदेने 7 जून रोजी प्रथमच आभासी हिंदू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हजारो लोकांनी फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला. सर्व लोक कोरोनाच्या संकट काळात एकत्र आले. जॉन हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरच्या म्हणण्यानुसार, विषाणूमुळे जगभरात 76,00,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे आणि 4,25,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाने अमेरिकेवर खूप मोठा प्रभाव पडला आहे. येथे 2.4 दशलक्ष (24 लाख) पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 1,14,000 लोक मरण पावले आहेत. गेल्या वर्षी चीनमधील वुहानमधून उत्पत्ती झालेल्या या विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जगातील शास्त्रज्ञ त्यासाठी लस किंवा उपचार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेकडो पदवीधरांनी हिंदूंची मूल्यांचं जतन करण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. प्रोफेसर सुभाष काक यांनी या समारंभाचे ग्रँड मार्शल म्हणून काम पाहिले. आपल्या भाषणात गॅबार्ड म्हणाल्या, 'आयुष्यातील या नव्या अध्यायाबद्दल विचार करताच, पण स्वतःला विचारा की माझ्या आयुष्याचा हेतू काय आहे? हा एक सखोल प्रश्न आहे. जर आपणास कळले की आपला उद्देश देव आणि त्यांच्या मुलांची सेवा करणं आहे. तर कर्मयोगाचा अभ्यास करा म्हणजे तुम्ही खरोखर यशस्वी जीवन जगू शकाल. त्या म्हणाल्या, 'तात्पुरत्या भौतिक वस्तू, दागदागिने, चमकदार वस्तू किंवा यश यांद्वारे यश परिभाषित केले जात नाही. हे एका खोल यशस्वी आणि आनंदी आयुष्याभोवती केंद्रित असते.
हेही वाचा
CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन
CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही