शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

ट्युनिशिया हल्ला; नऊ जण जेरबंद

By admin | Published: March 20, 2015 1:36 AM

ट्युनिशियातील हल्ल्याशी थेट संबंध असलेल्या ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ट्युनिस : ट्युनिशियातील हल्ल्याशी थेट संबंध असलेल्या ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी ट्युनिस येथील प्रसिद्ध बार्डो संग्रहालयावर बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २० विदेशी पर्यटकांसह २३ जण ठार झाले होते. दरम्यान, या हल्ल्याचा जगभरात निषेध होत आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे एएफपीचे वृत्त आहे.हल्लेखोरांपैकी दोघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यासीन लाबिदी आणि हतीम खाचनौली, अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, ट्युनिशियाचे अध्यक्ष बेजी कॅड एसेबसी यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराशी चर्चा केली. त्यानंतर सर्व मोठ्या शहरांत सुरक्षेसाठी लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मृतांपैकी १३ जणांची ओळख पटल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या हल्ल्यात एक पोलीसही ठार झाला. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या हल्ल्याचा निषेध करीत मृतांप्रती शोक व्यक्त केला. जगभरातूनही याचा निषेध होत आहे.नागरिकांचा मेणबत्ती मोर्चाट्युनिशियात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २३ लोक मरण पावल्यानंतर, नागरिकांनी आज गोळीबार झालेल्या बार्डो संग्रहालयावर मेणबत्ती मोर्चा काढला असून, अध्यक्षांनी दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अरब क्रांतीचे जन्मस्थान असणाऱ्या ट्युनिशियात झालेल्या या हल्ल्याचा जागतिक पातळीवर निषेध केला जात आहे. ट्युनिशिया आता दहशतवादविरोधी युद्धात उतरला आहे, ही बाब नागरिकांनी समजून घेतली पाहिजे, असे अध्यक्षबेजी कॅड एसेबसी यांनी म्हटले आहे. त्यांनी बार्डो वस्तुसंग्रहालयात परदेशी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यासंदर्भात मृतांचे आकडे वेगवेगळे दिले जात आहेत. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ठार मारले असून, त्यांच्या सहकाऱ्याचा शोध अजूनही चालू आहे. (वृत्तसंस्था)स्टॉकहोम : स्वीडनच्या गोथनबर्ग शहरातील एका उपाहारगृहात झालेल्या गोळीबारात अनेक लोक अडकले असून, दोन ठार झाले आहेत. गोथनबर्गच्या बिस्कोप्सगार्डन उपनगरात हा गोळीबार झाला. पोलीस प्रवक्ता उला ब्रेहम म्हणाल्या की, गोळीबारामागे कोणता उद्देश होता हे आता सांगणे घाईचे ठरेल; पण हल्लेखोर संघटनेशी संबंधित होते. ही घटना हा दहशतवादी हल्लाच असेल असे संकेत अद्याप मिळालेले नाहीत. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार दोन लोक स्वयंचलित शस्त्रे हाती घेऊन उपाहारगृहात शिरले. आत येताच त्यांनी गोळीबार सुरू केला. वार क्रोग ओच बार या हॉटेलमध्ये ही घटना घडली.