पाकिस्तानमध्ये महागाईने डोके एवढे वर काढले आहे की, पंतप्रधान इम्रान खान कर्ज घेऊन घेऊन थकले आहेत. भारताचा दुस्वास करण्याच्या नादात अर्थव्यवस्थाच देशोधडीला लावणाऱ्या पाकिस्तानसोबत आता त्यांचा मित्र आणि भारताला कट्टर दुश्मन मानणाऱा तुर्कस्तानही पंक्तीला जाऊन बसला आहे. तुर्कस्तानातही महागाईने आगडोंब उसळला आहे. सबसिडीवरील स्वस्त ब्रेड खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
दूध, औषधे आदी दैनंदिन वस्तूदेखील कमालीच्या महाग मिळत आहेत. तुर्कस्तानच्या या अवस्थेला महागाईने त्रस्त झालेल्या जनतेने राष्ट्राध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगान यांच्या आर्थिक नितींनाच जबाबदार धरले आहे.
तुर्कस्तानमध्ये ब्रेड हे त्यांच्या जेवनातील मुख्य पदार्थ आहे. एक वर्षात ब्रेडची मागणी प्रती व्यक्ती 200 ते 300 किलो आहे. अशात ब्रेडच्या वाढत्या किंमतींनी जनतेला हैरान केले आहे. तुर्कीमध्ये सबसिडीच्या 250 ग्रॅम ब्रेडची किंमत 6.87 रुपये आहे तर खासगी बेकरीमध्ये हा ब्रेड 14 रुपयांना मिळत आहे. या तफावतीमुळे लोक सबसिडीचा ब्रेड खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावत आहेत. वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या 71 वर्षीय नियाजी टोप्रेक यांनी अलजझीराला सांगितले की, सर्वकाही महाग होत चालले आहे. ब्रेडपासून खाण्या-पिण्याच्या सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. कपडे, मौजे देखील महागले आहेत.
लीरामध्ये ऐतिहासिक घसरणसोमवारी परिस्थिती तेव्हा खराब झाली जेव्हा अर्थ मंत्र्यांनी तुर्कीची केंद्रीय बँक 16 डिसेंबरला पुन्हा व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. यानंतर तुर्कीचे चलन लीरामध्ये ऐतिहासिक घसरण पहायला मिळाली. लीरा एकाच दिवसात डॉलरच्या तुलनेत 7 टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षभरात लीरामध्ये डॉलरच्या तुलनेत 48 टक्के घसरण झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात तुर्कीचा वार्षिक महागाई दर हा 21.3 टक्के झाला. मात्र, विरोधक हा दर यापेक्षा खूप जास्त असल्याचे म्हणत या आकड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.