6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात हजारो जखमी झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. भूकंपाच्या आधी तीन दिवस नेदलरँडच्या एका शास्त्रज्ञाने भूकंपा संदर्भात एक ट्विट केले होते. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फ्रँक हुजियरबाइट्स असं या शास्त्रज्ञाचे नाव आहे. या भूकंपाचा अंदाज त्यांनी तीन दिवस आधीच वर्तवला होता. यासोबतच भूकंपाच्या तीव्रतेचाही अंदाज दिला होता. हा अंदाज अचूक निघाला आहे.
3 फेब्रुवारी रोजी फ्रँक यांनी ट्विट केले होते. 'येत्या काही दिवसांत या भागात 7.5 तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. असा भूकंपाचा अंदाज लावता येऊ शकतो का असा प्रश्नही केला जात आहे. कारण आतापर्यंत या नैसर्गिक आपत्तीचा अंदाज बांधता येत नाही, असे मानले जाते.
फ्रँक हुजरबीट्सने ट्विटमध्ये एक ग्राफिकल फोटोही शेअर केला आहे. यामध्ये भूकंपाचा सर्वाधिक परिणाम ज्या भागात झाला आहे, त्याच भागाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
"आज नाही तर उद्या, या भागात (दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन) 7.5 तीव्रतेचा भूकंप होईल.", असं ट्विट त्यांनी केले होते.
फ्रँक हे नेदरलँडमधील एका संशोधन संस्थेत संशोधक आहेत. संस्थेचे नाव सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) आहे. त्याचे मुख्य कार्य खगोलीय पिंड आणि भूकंप क्रियाकलाप यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणे आहे.
भूकंप संदर्भात फ्रँक यांनी ट्विटसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते या भूकंपाचा अंदाज व्यक्त करत आहे. हा व्हिडीओ 2 फेब्रुवारी रोजी यूट्यूबवर सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षणाने अपलोड केला होता. यामध्ये फ्रँक सांगत आहे की, 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान जोरदार भूकंप होण्याची शक्यता आहे. ग्रहांच्या संरेखनाच्या आधारे त्यांनी हा अंदाज लावला होता.
हृदयद्रावक! "माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक
या भूकंपाच्या या अंदाजावर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. भूकंपाचा अंदाज लावण्याचा कोणताही वैज्ञानिक मार्ग नाही, असे अनेकांनी थेट सांगितले. जेव्हा लोकांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा फ्रँकने ट्विट करून उत्तर दिले की होय, वैज्ञानिक समुदायामध्येही ग्रह आणि चंद्राच्या प्रभावाबाबत खूप विरोधाभास आहे. पण त्याचे खंडन करण्यासाठी पुरेसे संशोधनही झालेले नाही. हा फक्त अंदाज आहे, असेही ते म्हणाले.