Turkey Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 560 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमध्ये प्रचंड विध्वंसतुर्कीमध्ये भूकंपग्रस्त भागातील मशिदींमध्ये लोकांना आश्रय दिला जात आहे.स्थानिक वेळेनुसार, तुर्कीमध्ये पहाटे 04:17 वाजता भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. हे सीरिया सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत सीरियातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सीमेच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक इमारती जमीनदोस्ततुर्कीच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने सांगितले की, तुर्कीच्या 7 प्रांतांमध्ये 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जण जखमी झाले आहेत. सीरियातील मृतांची संख्या 237 वर पोहोचली आहे. तर 630 जण जखमी झाले आहेत. सीरियातील अलेप्पो आणि हमा शहरांमध्ये इमारतींना सर्वाधिक फटका बसला आहे. तुर्कीतील दियारबाकीरमध्ये इमारती कोसळल्याची बातमी आहे.
यामुळे तुर्कीमध्ये भूकंप होताततुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दुगन यांनी ट्विट करून भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले. भूकंपाच्या वेळी किमान 6 आफ्टरशॉक बसले होते. एर्दुगन यांनी लोकांना नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन केले. 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर 7.5 रिश्टर स्केलचा दुसरा मोठा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांनी तुर्कस्तान आणि सीरिया किमान सहा वेळा हादरले. सर्वात मोठा धक्का 40 सेकंद जाणवला. यामुळे सर्वाधिक विध्वंसही झाला. तुर्की चार टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर वसलेले आहे, म्हणूनच कोणत्याही प्लेटमध्ये थोडीशी हालचाल संपूर्ण परिसर हादरते.
पीएम मोदींनी शोक व्यक्त केलातुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, तुर्कस्तानमधील भूकंपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात अनेकांचा मृत्यू आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. तुर्कस्तानच्या आसपासच्या देशांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत तयार आहे.