Turkey Earthquake News: वरील फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्याचा चेहरा तुम्हाला आठवतोय का? या चिमुकल्याने तब्बल 128 तास मृत्यूशी झुंज दिली होती. फेब्रुवारीमध्ये तुर्कस्तन देशात भीषण भूकंप आला होता. भूकंपानंतर 128 तास हा चिमुकला एकटा इमारतीच्या ढिगाऱ्याकाळी अडकला. त्या चिमुकल्याच्या आईचा भूकंपात मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण त्याची आई जिवंत असल्याची माहिती मिळाली आहे.
54 दिवसानंतर चिमुकला आईच्या कुशीतही संपूर्ण घटना चमत्कारापेक्षा कमी नाही. भूकंपाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तब्बल 54 दिवसांनी चिमुकला पुन्हा आईच्या कुशीत गेला आहे. डीएनए चाचणीनंतर त्याच्या आईची ओळख पटली. यास्मीन बेगदास असे या मुलाच्या आईचे नाव आहे. यास्मीनचा भूकंपात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, नंतर समजले की, तिच्यावर अडाना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
युक्रेनच्या गृहमंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी या आनंददायी बातमीसह बाळाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. स्थानिक तुर्की न्यूज वेबसाइटनुसार, मुलाच्या आईवर आणि मुलावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. आईलाही वाटले होते की, तिचा बाळाचा मृत्यू झाला आहे. पण, आता अखेर 54 दिवसांनी बाळाची आईशी भेट झाली. तुर्कीचे मंत्री डेरिया यानिक यांनी ट्विटरवर आई-मुलाच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.