इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्दात दोन्ही बाजूंचे लोक मारले जाताहेत. काही रिपोर्ट्सनुसार, हमासच्या हल्ल्यात 5 हजारांहून अधिक इस्रायली लष्करी सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे, तर 17 हजारांहून अधिक पॅलेस्टिनीही या युद्धात मारले गेल्याची माहिती आहे. या युद्धामुळे दोन गट पडले आहेत. एक गट हमासला क्रूर म्हणत आहेत तर दुसरा इस्रायलला शिव्या देताहे. यामध्ये तुर्कीच्या खासदारांचाही समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर तुर्कीच्या एका खासदाराचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
तुर्कीचे खासदार जाहीर सभेत इस्रायलला शिव्याशाप देत होते, यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर सभेत गोंधळ झाला. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हसन बिटमेझ असे या खासदाराचे नाव आहे. ही घटना गेल्या मंगळवारी घडली. इस्रायल कधीही देवाच्या क्रोधापासून वाचू शकणार नाही, असे म्हणत असताना खासदाराला झटका आला. यानंतर तात्काळ त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
व्हिडिओ पहा
सीपीआर दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. दरम्यान, बहुतांश देश हे युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहेत. यासाठी गाझा युद्धविराम ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे, ज्याच्या बाजूने 150 हून अधिक देशांनी मतदान केले आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. इस्रायल आणि अमेरिकेसह अनेक देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आहे, म्हणजेच ते युद्ध थांबवण्याच्या बाजूने नाहीत.