शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तुर्की, सिरिया भूकंपाने उद्ध्वस्त! 2,650 वर ठार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, हजारो गाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 6:05 AM

लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु तेथे नुकसानीचे वृत्त नाही.

अंकारा : गाढ झोपेत असताना धरणी हलली... पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या.. एक-दोन नव्हे तर शेकडो इमारती भुईसपाट झाल्या. हजारो जण गाडले गेले अन् २,६५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आग्नेय तुर्की आणि सिरियात सोमवारी पहाटे भूकंपाने हाहाकार माजला. शक्तिशाली ७.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने दोन्ही देश हादरले. तुर्कीत किमान १,६५१ जणांचा, तर सिरियात १००० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु तेथे नुकसानीचे वृत्त नाही. तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओकटायस अर्दोगान यांनी १९३९ नंतरचा हा सर्वात संहारक भूकंप असल्याचे सांगितले.  बचावकर्ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा बाधित भागात शोध घेत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

२,८१८ पेक्षा अधिक इमारती तुर्कीत कोसळल्या -कैरोपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा केंद्रबिंदू सिरियाच्या सीमेपासून ९० किमी अंतरावर असलेल्या गाझियानटेप शहराच्या उत्तरेला होता. तुर्कीमध्ये ३० मिनिटांत भूकंपाचे तीन मोठे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता हा भूकंप झाला. 

६.७ तीव्रतेचा दुसरा धक्का ११ मिनिटांनी आला. ५.६ रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप १९ मिनिटांनी झाला. भूकंपानंतर सुमारे २० धक्के जाणवले, त्यापैकी सर्वात शक्तिशाली ६.६ तीव्रतेचा होता. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचे वृत्त आहे.  

मृत आकडा १० हजारांपर्यंत जाणार?अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार (यूएसजीएस) भूकंपाचा केंद्र गाझिआनटेपपासून ३३ किमी अंतरावर १८ किमी खोलीवर होता. हा भूकंप अशावेळी झाला जेव्हा पश्चिम आशिया बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात आहे. यूएसजीएसनुसार ‘तुर्कीमध्ये मृतांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली असून ती १० हजारांपर्यंत पोहोचू शकते.

भारत तुर्की, सिरियाच्या पाठीशीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तुर्की आणि सिरियातील भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करीत भारत या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आग्नेय तुर्कीला नवीन शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला  

टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यू