Turkey Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपात आतापर्यंत 15 हजारांपून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर यापेक्षा दुप्पट लोक जखमी झाले आहेत. तसेच, दोन्ही देशातील हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. यातच एका सीरियन निर्वासिताने त्याच्या कुटुंबातील 25 सदस्यांना गमावल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धातून वाचले, पण...अहमद इद्रिस असे या निर्वासिताचे नाव असून, त्याचे संपूर्ण कुटुंब युद्धग्रस्त सीरियातून पळून आले होते आणि तुर्कीच्या सीमेवर असलेल्या शेल्टर होममध्ये राहत होते. अम्हाद इद्रिस या निर्वासिताने एएफपी या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, 2012 मध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब सीरियातून पळून आले होते आणि सारकिब येथे अश्रयास होते. युद्धजन्य परिस्थितीतून जीव वाचवण्यासाठी इथे पळून आले, पण भूकंपाने सर्वांना संपवले.
कुटुंबातील सर्वांचा मृत्यूभूकंपानंतर इद्रिस शवागारात पोहोचला तेव्हा त्याला सगळीकडे मृतदेहांचा ढीग पडलेला दिसला. या ढिगाऱ्यांमधून तो आपल्या कुटुंबातील सदस्यांना एक एक करून ओळखायचा आणि त्यांच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडायचा. आपल्या मृत नातवाला मिठी मारताना इद्रिसने आकाशाकडे पाहिले आणि खूप रडला. या भूकंपात इद्रिसने त्याची मुलगी, दोन मुले, मुलीच्या सासरचे कुटुंब, नातवंड असे एकूण 25 लोक गमावले.
मृतांचा आकडा वाढणारतुर्की आणि सीरियामध्ये आलेला भूकंव मागील एका दशकाहून अधिक काळातील सर्वात मोठी घटना आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये उद्ध्वस्त झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपातील मृतांची संख्या 8,800 होती, पण या भूकंपात त्याच्या दुप्पट लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सध्या सुरू आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, उद्यापर्यंत मृतांची संख्या 20,000 पर्यंत पोहोचू शकते.
भारताची मदततुर्कस्तानमध्ये भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोर्चेबांधणी केली आहे. भारतीय लष्कराने भूकंपग्रस्त भागात एक फील्ड हॉस्पिटल उभारले आहे, जिथे जखमींवर सतत उपचार केले जात आहेत. एनडीआरएफच्या तीन टीम भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्यांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. यापूर्वी 1999 मध्ये तुर्कीमध्ये भूकंप आला होता, ज्यात 17,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.