नवी दिल्ली : ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ४:१५ वाजल्यापासून तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे हादरे बसायला सुरुवात झाली. पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा त्यातून निघणाऱ्या भूकंपाच्या लहरी २६६ कि.मी.पर्यंत पसरत गेल्या. तीव्र भूकंपाची खोली १० ते २० किमी दरम्यान असते. दियारबकीर शहरात पहिल्याच धक्क्याने १८ मजली उंच इमारत कोसळली. पहिल्या लाटेचा प्रभाव २ हजार कि.मी.पर्यंत जाणवला.
भूकंप नेमका का? -तुर्कीच्या खाली ‘टेक्टोनिक्स सोनिक प्लेट’ (भूस्तर) सतत कंपन करत आहे. ती ‘अफरिन प्लेट’वर दबाव आणत आहे. त्यामुळे येथे सात रिश्टरपेक्षाही अधिक तीव्रतेचे भूकंप होतात. दुसरीकडे, अरेबियन टेक्टोनिक प्लेट तुर्की प्लेटला दाबत आहे. युरेशियन प्लेटवरून वेगळ्या दिशेने फिरत आहे. या प्लेट्सच्या ढकलण्यामुळे भूकंप होत आहेत.
दोनदा भूकंप का? -तुर्कीच्या खाली असलेला सूक्ष्म भूस्तर उलट दिशेने फिरत आहे. अरेबियन स्तर या छोट्या स्तराला धक्का देत आहेत. फिरणाऱ्या ॲनाटोलियन स्तराला अरेबियन प्लेटने धक्का दिला की, ती युरेशियन स्तराला आदळते. त्यामुळे दोनदा भूकंप होतात.
आता सतत दबाव -तळाचा स्तर पूर्वी मागे होता, जो आता सतत दबावामुळे पुढे सरकत आहे. त्यामुळे वरच्या जमिनीला तडे जाण्याची शक्यता असते.
६,२०० हून अधिक मृत्यू -६,२०० हून अधिक मृत्यू तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंपात झाले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. इमारतींखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने बळींची संख्या वाढत आहे.
भारताची भरीव मदतभूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने मंगळवारी तुर्कस्तानच्या लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी ८९ डॉक्टरांचे एक पथक पाठवले. त्यांच्याबरोबर क्ष-किरण मशीन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कार्डियाक मॉनिटर्स आदी उपकरणे आहेत. मदत सामग्रीसह पहिले विमान सोमवारी रात्री रवाना करण्यात आले. तुर्कीचे दु:ख मी समजू शकतो : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तुर्कीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी मोदी म्हणाले, ‘तुर्की आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे ते मी समजू शकतो. २००१ मध्ये भूजला भूकंप झाला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. बचाव कार्यात काय अडचणी आहेत हे मला माहीत आहे.
डोळ्यांत अश्रू अन् जगण्याची आशा... -भूकंपातून आश्चर्यकारकपणे बचावल्यानंतर ढिगाऱ्याखाली ७ वर्षांची चिमुकली लहानग्या भावाच्या रक्षणासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवून मदतीची वाट बघताना...