इस्तांबुल : टर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ बांधण्यात आले आहे. या विमानतळाचे उद्घाटन 29 ऑक्टोबरला राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांच्या हस्ते करण्यात आले.
जवळपास 9 कोटी प्रवाशांची क्षमता असलेले हे विमानतळ 19 हजार एकरात पसरले आहे. तसेच, 250 एअरलाइन्स 350 पेक्षा जास्त जागेवरुन उड्डाणे करतील असे हे विमानतळ असून संपूर्ण हायटेक बनविले आहे. विमानतळावर ऑर्टिफीशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याचबरोबर, विमानतळ एटीसी ट्युलिप डिझाइनमध्ये करण्यात आले आहे.
या विमानतळाचे उद्धाटन करण्यासाठी 18 देशांतील 50 नेते गोल्फ कार्टवरुन आले होते. टर्कीचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांनी स्वत: गोल्फ कार्ट चालविली. या विमानतळाची निर्मिती करण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. तसेच, या विमानतळाचे बांधकाम करतेवेळी वाद निर्माण झाला होता. बांधकामादरम्यान 30 कामगारांचा मृत्यू झाला होता.
विमानतळ बांधण्यासाठी 35 हजारहून अधिक कामगार आणि तीन हजार अभियांत्याचे योगदान लाभले आहे. 2028 पर्यंत या विमानतळावरुन 20 कोटी लोक प्रवास करु शकणार आहेत. दरम्यान, जगात सध्या अटलांटा विमानतळावरुन 10 कोटी लोक प्रवास करतात.