सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे शुक्रवारी गॅलातासारे आणि फेनेरबहसे यांच्यात होणारी तुर्की सुपर कप फायनल पुढे ढकलण्यात आली. राजकीय घोषणा असलेला टी-शर्ट परिधान केल्याने हा सामना रद्द केल्याचे समोर आले आहे. एका क्लबच्या खेळाडूंनी राजकीय घोषणा असलेला टी-शर्ट घालायचा होता. इस्तंबूलच्या दोन संघांना संध्याकाळच्या किक-ऑफपूर्वी सराव करताना आधुनिक तुर्कीचे संस्थापक मुस्तफा केमाल अतातुर्क यांचा फोटो असलेले टी-शर्ट घालायचा होता. तर तुर्की मीडियाच्या वृत्तानुसार सौदी अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर या फुटबॉल क्लबांनी अल-अव्वाल पार्क स्टेडियम येथे सुपर कप फायनल खेळण्यास नकार दिला.
अखेर ४ महिन्यांनी चीनला मिळाले नवे संरक्षण मंत्री! नौदल कमांडर डोंग जून यांची नियुक्ती
सौदी राज्य टीव्हीने रियाध हंगामाच्या आयोजकांच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, संघांनी सामन्याचे नियम न पाळल्यामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल नियमांनुसार सामना वेळेवर आयोजित करू इच्छित होतो, जे कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजीला प्रतिबंधित करते, तरीही तुर्की फुटबॉल महासंघाशी याबाबत चर्चा करण्यात आली होती. हा करार असूनही दोन्ही संघांनी त्याचे पालन केले नाही, त्यामुळे सामना होऊ शकला नाही, असंही पुढे म्हटले आहे.
फुटबॉल क्लबने दिले स्पष्टीकरण
दोन्ही संघ आणि तुर्की फुटबॉल महासंघाकडूनही या प्रकरणी स्पष्टीकरण आले आहे. या संयुक्त निवेदनात तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. फायनल कधी आणि कुठे होणार हे सध्या स्पष्ट नाही. या निवेदनात, फुटबॉल महासंघ आणि सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले आहेत. फायनलमध्ये तुर्कीचे राष्ट्रगीत आणि ध्वज वाजवण्यास परवानगी दिली जाणार नसल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या, परंतु टीएफएफने याआधी सांगितले होते की त्यांना स्पर्धेत समाविष्ट केले जाईल.