Operation Dost: तुर्कस्तान-सीरियात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतरभारताने मदत आणि बचावकार्यासाठी NDRFची पथके तिथे पाठवली आहेत. या कठीण परिस्थितीत भारतासह जगातील अनेक देश तुर्की आणि सीरियाला मदत करत आहेत. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर दोन्ही देशांच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले आहे.
या मोहिमेअंतर्गत एनडीआरएफचे पथक भूकंपग्रस्त भागात काम करत आहेत. एनडीआरएफच्या या प्रयत्नांमुळे ढिगाऱ्यात अडकलेल्या 6 वर्षीय मुलीचा जीव वाचला आहे. दोन भारतीय स्निफर डॉग - रोमिओ आणि ज्युली यांनी मुलीला ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्युली आणि रोमियोच्या मदतीने 80 तासांनंतर मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. तेव्हापासून तुर्कस्तानमध्ये ज्युली आणि रोमियोची बरीच चर्चा आहे.
6 वर्षाच्या मुलीचे प्राण कसे वाचवले?शोध मोहिमेदरम्यान ज्युली ढिगाऱ्याच्या आत गेली, तेव्हा तिने लहान मुलगी जिवंत पाहिले आणि भुंकायला लागली. यावरुन ती मुलगी आतमध्ये असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर रोमियो ढिगाऱ्याच्या आत गेला आणि त्यानेही मुलगी जिवंत असल्याची पुष्टी केली. यानंतर 6 वर्षीय मुलीचा जीव वाचला. दरम्यान, भूकंपामुळे तुर्की-सीरियात आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला असून 7 दिवसांनंतरही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.