वॉशिंग्टन : अमेरिकेत आलेल्या स्नोजिला या वादळाने आणि हिमवर्षावाने आतापर्यंत १८ बळी घेतले आहेत, तर दहा राज्यांत यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. देशातील साडेआठ कोटी नागरिकांना या वादळाचा फटका बसला असून, हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.अमेरिकेच्या उत्तर-पूर्व भागात हे वादळ आले आहे. अनेक ठिकाणी तीन फुटांपर्यंत बर्फ साठला आहे. लाखो नागरिक या हिमवादळाने प्रभावित झाले आहेत, तर जनजीवन ठप्प झाले आहे. राजधानी वॉशिंग्टनसह अमेरिकेच्या मोठ्या शहरात दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. अनेक भागात वीज गायब झाली आहे. अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे कार अपघातात या १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, पेनसिल्वानिया भागात ५०० पेक्षा जास्त वाहने फसले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, रात्रीनंतर हे वादळ काहीसे कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)न्यूयॉर्कमध्ये मेट्रो सेवा थांबविण्यात आली आहे. महापौर बिल डी ब्लेसियो यांनी आवाहन केले आहे की, शहरवासीयांनी शक्यतो वाहने रस्त्यावर आणू नयेत. कारण, आपत्कालीन परिस्थितीत रस्ते खुले असायला हवेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यावरील बर्फ हटविण्यासाठी आणि एकूणच परिस्थिती सामान्य होण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
हिमवादळाचे अमेरिकेत अठरा बळी
By admin | Published: January 25, 2016 2:05 AM