थायलँड- सुरीन प्रांतातील सुतात म्मिसाती (३७) यांच्या डोक्याच्या आकाराच्या दोनपट वाढलेला गोळा अखेर शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागला. सुतात यांना ते दोन वर्षांचे असतानापासून डोक्यात वेदना व्हायच्या, परंतु त्याकडे कोणी लक्ष दिले नाही व मग तो गोळा इतका वाढला की, त्याच्यासह वागणे फिरणे त्रासदायक झाले. गरिबी आणि दारिद्र्य असलेल्या सुरीन प्रांतात राहणारे सुतात यांना या गोळ््यावरील शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करणे खर्चाच्या दृष्टीने शक्य नव्हते. सुतात यांची होणारी आबाळ व त्रास स्वयंसेवकांना समजला व त्यांनी डॉक्टरांकडून त्या गोळ््याच्या आवश्यक त्या चाचण्या करून योग्य निदान करून घेतले. या गोळ््यावर चुलालोंगकोर्न हॉस्पिटलमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेसाठी अनेक सहृदयींनी दोन हजार पौंड दिले. या शस्त्रक्रियेमुळे सुतात यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता येईल. शस्त्रक्रियेनंतर सुतात म्हणाले की, ‘मी आता सामान्य जीवन जगू शकेल. ज्या-ज्या कोणी मला मदत केली त्यांचे आभार. मी पहिल्यांदाच सामान्य जीवन जगू शकेन. मला लग्न करायला व मुलांचा बाबा व्हायला आवडेल.’ शस्त्रक्रियेपूर्वी मी खूपच ओंगळवाणा दिसायचो. कोणतीही स्त्री माझ्याकडे बघायची नाही व बघितल्यास माझी त्यांना कीव यायची, असेही सुतात म्हणाले.
डोक्याच्या आकारापेक्षा दुप्पट गोळा काढला
By admin | Published: March 02, 2017 4:27 AM