नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. यातच कोविडचे नवनवीन व्हेरिएंट लोकांसाठी धोकादायक ठरत असल्याचं समोर आलं आहे. यूकेच्या नव्या स्टडीनुसार, कोविड १९ च्या डेल्टा व्हेरिएंट संक्रमित लोकांना अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका दुपटीनं आढळून आला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि कॅम्ब्रिज यूनिवर्सिटीनं हा रिपोर्ट तयार केला आहे.
शुक्रवारी द लैसेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका ते लोकांना पूर्णपणे आरोग्यविषयक काळजी घेण्यावर भर दिला आहे. संशोधकांनी सांगितले आहे की, अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट(Coronavirus Delta Variant) अधिक संक्रमण पसरवणारा आहे. या स्टडीत अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा संक्रमित रुग्णांना आपत्कालीन आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका अधिक आढळला आहे. लसीकरण न झालेली लोकसंख्या जर डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात अडकली तर अल्फा व्हेरिएंटहून अधिक आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे.
या स्टडीत ४३ हजार ३३८ कोविड रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. मार्च ते मे या काळात अल्फा आणि डेल्टा दोन्ही यूकेत होते. ज्या लोकांचं लसीकरण झालं नाही अशा लोकांचे प्रमाण कोरोनानं संक्रमित होणाऱ्यांमध्ये अधिक आहे. या स्टडीमुळे मागील रिपोर्टची पुष्टी झाली आहे. अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटनं संक्रमित रुग्णांना हॉस्पिटलची जास्त गरज भासू शकते. पण यात बहुतांश लस न घेतलेल्यांचा समावेश असेल असं पीएचई नॅशनल इन्फेक्शन सर्व्हिसचे डॉ. गोविन डबरेरा यांनी सांगितले आहे.
ताज्या निष्कर्षानुसार, ब्रिटनमध्ये ४७.९ मिलियनपेक्षा अधिक लोक अथवा १६ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ८८ टक्के लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जवळपास ४२ मिलियन लोकांना ७८ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. लसीकरण डेल्टा व्हेरिएंटविरोधात उत्तम प्रकारे सुरक्षा प्रदान करते. यूकेत ९८ टक्के प्रकरण समोर आले आहेत. ज्या लोकांनी लसीकरणाचाही एकही डोस घेतला नाही अशांनी लवकरात लवकर लस घ्यावी हे महत्वाचं आहे असं गोविन डबरेरा यांनी सांगितले.