मुंबई : चीनने कोरोना संक्रमणाबाबत कोणतीही लपवाछपवी न करता योग्य वेळी माहिती दिली. तसेच, हाँगकाँगबाबत चीनचे धोरणही योग्यच आहे असा प्रचार करणारी आणि चीन सरकारच्या वादग्रस्त धोरणांचे समर्थन करणारी सुमारे १ लाख ७० हजार खाती ट्विटरने बंद केली आहेत.चीनने हाँगकाँगसाठी लागू केलेल्या नव्या कायद्याच्याविरोधात जगभारातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाँगकाँग येथे लोकशाहीच्या समर्थनार्थ आंदोलनही सुरू आहे. त्याला अनेकदा हिंसक वळणही लागले. परंतु, ही ट्विटर खाती चीनच्या या प्रयत्नांचे समर्थन करत होती. त्याशिवाय कोरोना विषाणूबाबाच चीनने लपवाछपवी केल्याचे आरोप अमेरिकेने केलेला आहे.चीनच्या भूमिकावर जगभरात संशयाचे वातावरण आहे. परंतु, चीनने योग्य वेळी माहिती दिल्याचे दावे या खात्यांवरून केले जात होते. चीनचे प्रत्येक धोरण हे योग्यच आहे असे ठसविण्याचा प्रयत्न त्यावर होत होता. चीन आणि तिथल्या कम्युनिस्ट पक्षाची धोरणे ही योग्यच असल्याचा प्रचारही सुरू होता. परंतु, चीन सरकारची तळी उचलून धरणारी ही खाती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विटरने नमूद केले आहे. चीनमध्ये ट्विटरचा अधिकृतरीत्या वापर बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतरही व्हीपीएन नेटवर्क च्या साहाय्याने ही खाती कार्यरत होती. त्या खात्यांवर चिनी भाषेतच मजकूर प्रसिद्ध केले जात होते. २३ हजार ७५० खाती तर चिनी प्रवक्ते असल्याप्रमाणे सक्रिय होती. रशिया आणि तुर्की या देशातील काही खातीसुद्धा याच कारणास्तव बंद करण्यात आली आहेत.
चीनची तळी उचलणारी दीड लाख ट्विटर खाती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 3:43 AM