शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

दोन प्राचीन भारतीय मूर्ती अमेरिकेत जप्त

By admin | Published: March 13, 2016 3:55 AM

भारतातून चोरलेल्या दोन प्राचीन मूर्ती अमेरिकेतील प्रमुख लिलावगृहातून जप्त करण्यात आल्या आहेत. साडेचार लाख अमेरिकी डॉलर बाजारमूल्य असलेल्या या मूर्तींचा पुढील आठवड्यात लिलाव होणार होता.

वॉशिंग्टन : भारतातून चोरलेल्या दोन प्राचीन मूर्ती अमेरिकेतील प्रमुख लिलावगृहातून जप्त करण्यात आल्या आहेत. साडेचार लाख अमेरिकी डॉलर बाजारमूल्य असलेल्या या मूर्तींचा पुढील आठवड्यात लिलाव होणार होता. आंतरराष्ट्रीय चौकशीनंतर वाळूच्या खडकापासून बनलेल्या या मूर्ती न्यूयॉर्क येथून जप्त करण्यात आल्या. भारत सरकार व ‘इंटरपोल’च्या मदतीने स्थलांतर आणि सीमा शुल्क अंमलबजावणी विभागातील गृहसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मूर्ती एशिया वीक न्यूयॉर्कमधील ख्रिस्तीज लिलावगृहाच्या ‘द लाहिरी कलेक्शन : इंडियन अ‍ॅण्ड हिमालयन आर्ट एइन्शट अ‍ॅण्ड मॉडर्न’ या प्रदर्शनात १५ मार्च रोजी लिलावासाठी ठेवण्यात येणार होत्या. यापैकी एक मूर्ती पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांची आहे. ही मूर्ती दहाव्या शतकातील असून ती राजस्थान किंवा मध्यप्रदेशातील असण्याची शक्यता आहे. या मूर्तीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य दीड लाख अमेरिकी डॉलर आहे. दुसरी मूर्ती आठव्या शतकातील असून त्यात रेवंता आणि त्यांचे शिष्य दाखविण्यात आले आहेत. या मूर्तीचे मूल्य तीन लाख अमेरिकी डॉलर आहे. आमच्या या कारवाईने आमचे बाजारावर, प्राचीन मूर्तींचे विक्रेते व खरेदीदार यांच्यावर लक्ष असल्याचे स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)