शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

Corona Vaccination: चिंता वाढली! Covishield चा एक डोस भारतीय व्हेरिअंटविरोधात अपुरा; ब्रिटनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:47 PM

Corona Virus new Indian strain: ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण थोडे वाढले आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच तिथे दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे करण्यात आले आहे. 

Covishield: कोरोनाच्या भारतीय व्हेरिअंटविरोधात (Corona New Variant) ऑक्सफर्ड, अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा एकच डोस कमी प्रभावी असल्याचे समोर येत आहे. युके सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आकडे याकडे इशारा करत आहेत. त्यांच्या संशोधनानुसार कथितरित्या भारतात सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरिअंटपासून सुरक्षा देण्यास कोरोना लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. (Two Covishield vaccine doses needed for strong protection against B.1.617.2 variant found in India: Report)

पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) च्या आकड्यांनुसार भारतात सापडलेल्या B.1.617.2 व्हेरिअंटविरोधात कोव्हिशिल्ड (ब्रिटनची लस) कोरोना लसीच्या दोन डोसनी 81 टक्के सुरक्षा प्रदान केली. तर दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या B.1.1.7 व्हेरिअंटविरोधात 87 टक्के सुरक्षा दिली. या आकडेवारीनुसार कोरोना लसीचा एक डोस B.1.617.2 व्हेरिअंटविरोधात केवळ 33 टक्केच परिणामकारक ठरला आहे. तर B.1.1.7 व्हेरिअंटविरोधात 51 टक्के परिणामकारक ठरला आहे. फायनान्शिअल टाईम्सनुसार कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस B.1.1.7 व्हेरिअंटच्या तुलनेत B.1.617.2 वर 35 टक्के कमी सुरक्षा प्रदान करतो. 

PHE ने बायोएनटेक/फाइजर आणि ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लसींच्या  माहितीचा अभ्यास केला आहे. यामध्ये ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाचे दोन डोस 85 ते 90 टक्के परिणामकारक आहेत. ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टीट्य़ट कडून केले जाते. यामुळे या लसीचा परिणाम भारतात सापडलेल्या कोरोना स्ट्रेनवर तेवढाच आहे. 

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार गेल्या काही दिवसांपासून युकेमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण थोडे वाढले आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तसेच तिथे दोन डोसमधील अंतर हे 12 आठवड्यांचे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या