पॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये अज्ञात व्यक्तीनं चाकू हल्ला केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईत अज्ञात हल्लेखोर ठार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली आहे. शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या मध्यवर्ती भागात एका अज्ञात व्यक्तीनं आसपास असलेल्या लोकांवर चाकूहल्ला सुरु केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. चौघा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चाकूनं वार करण्याआधी 'अल्लाहू अकबर' असं ओरडत होता. या माहितीच्या आधारे आता या प्रकरणाचा दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनं तपास करण्यात येत आहे.
पॅरिसमधील चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; आयसिसनं स्वीकारली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 7:01 AM