ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 28 - नर्सिंग होमच्या फ्रिजमध्ये इंजेक्शन, औषधे असे साहित्य असले पाहिजे. पण न्यूयॉर्क येथील नर्सिंग होमच्या फ्रिजमध्ये चक्क दुस-या महायुद्धाच्या काळातील दोन ग्रेनेड सापडले. तपन झी मनोर नर्सिंग होममध्ये स्फोटके असल्याची बातमी आल्यानंतर लगेचच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.
ज्या व्यक्तीच्या मालकीचे हे नर्सिंग होम आहे त्याच्या कारचीही तपासणी करण्यात आली. पण इमारतीत अन्यत्र कुठेही स्फोटके सापडली नाहीत. काऊंटीच्या शेरीफ बॉम्ब निकामी पथकाने हे ग्रेनेड ताब्यात घेतले.
दोन तास इमारतीचा कोपरा न कोपरा तपासल्यानंतर रहिवाशांना पुन्हा इमारतीत प्रवेश देण्यात आला. हे ग्रेनेडस ज्याच्या मालकीचे आहेत तो माणूस छापा मारण्यात आला त्यावेळी उपचारासाठी बाहेर होता.