बीजिंग : संशयित तीन उघूर अतिरेक्यांनी अशांत शिनजियांग प्रांतातील कॅराकॅक्स परगण्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर कार धडकवून घडवलेल्या स्फोटात दोन जण ठार झाले. नंतर हल्लेखोरांना पोलिसांनी ठार मारले. हल्लेखोरांनी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकाला ठार मारले तर तिघांना जखमी केले, असे वृत्त शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. त्या आधीच्या वृत्तात चार जणांनी हल्ला केल्याचे व त्यात निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, शिनजियांग सरकारने हल्लेखोरांची ओळख जाहीर केलेली नाही. उघूर प्रांतात बहुसंख्य हान वंशाच्या चिनी लोकांच्या वसाहती निर्माण केल्या जात असल्यामुळे अनेक वर्षांपासून उघूर मुस्लीम अस्वस्थ आहेत. दहशतवाद्यांच्या हिंसाचाराने त्रस्त असलेल्या या भागात काही महिन्यांपासून शांतता होती. उघूर प्रांत नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असून, तो पाकव्याप्त काश्मीर व अफगाणच्या सीमेला लागून आहे. (वृत्तसंस्था)
चीनमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन ठार, तीन जखमी
By admin | Published: December 30, 2016 2:25 AM