कतारच्या राजघराण्यातील दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात आले आहेत. लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादात दोघे भाऊ सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी लंडन उच्च न्यायालयात पोहोचले. आता या वादावर न्यायालय निर्णय देणार आहे. दोन्ही बाजू एकमेकांविरोधात आरोप करत आहेत.
कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचे चुलत भाऊ शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांनी माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हमाद बिन अब्दुल्ला यांच्या मालकीची कंपनी ७० कॅरेटचे रत्न खरेदी करण्याचा कथित अधिकार लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांच्या QIPCO कंपनीकडे 'आयडॉल्स आय' नावाचा हिरा आहे. याची किंमत लाखो डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. हा हिरा शेख सौद यांनी त्यांना उधार दिला होता. शेख सौद हे १९९७ ते २००५ दरम्यान कतारचे सांस्कृतिक मंत्री होते. त्यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला आयडॉल आय डायमंड खरेदी केला होता. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांनी हा हिरा शेख हमद बिन अब्दुल्ला यांच्या QIPCO या कंपनीला दिला होता. यावेळी, त्यांनी एक करार देखील केला यामध्ये क्यूआयपीसीओला एलानस होल्डिंग्जच्या संमतीने हिरा खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला होता, जी शेवटी शेख सौद यांच्या नातेवाईकांशी जोडलेली कंपनी होती.
शेख सौद यांच्या एलेनस होल्डिंग्स या कंपनीने हा हिरा QIPCO ला दिला होता. एलेनस होल्डिंग्ज आता लिक्टेंस्टीन-आधारित अल थानी फाउंडेशनच्या मालकीची आहे, याचे लाभार्थी शेख सौद आणि तीन मुले आहेत. हे पत्र चुकून पाठवण्यात आल्याचा ॲलेन्सचा तर्क आहे. ॲलेन्सचे वकील साद हुसेन यांनी न्यायालयीन दाखल्यांमध्ये सांगितले की शेख सौद यांचा मुलगा शेख हमद बिन सौद अल थानी यांनी फक्त योग्य किमतीत विक्रीची शक्यता शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण फाउंडेशनच्या इतर लाभार्थ्यांशी चर्चा केली नव्हती.
आता QIPCO ला हा हिरा १० मिलियन डॉलर्समध्ये विकत घ्यायचा आहे आणि या मुद्द्यावर, QIPCO च्या वकिलांचे म्हणणे आहे की, २०२० च्या पत्रात अल थानी फाउंडेशनच्या वकिलांनी आयडॉल आय हिरा १० मिलियन डॉलर्समध्ये विकण्याची तयारी दर्शवली होती, पण एलेनस होल्डिंग्सने ते विकत घेतले आहे. या हिऱ्याची किंमत कमी लेखली जात असून त्याची खरी किंमत २७ मिलियन डॉलर्स असल्याचे सांगितले.