बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूमुळे आणखी १३६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या बुधवारी २००० हून अधिक झाली आहे, तर एकूण ७४,१८५ लोकांना संसर्ग झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २००४ झाली आहे. संसर्गाचे नवे १७४९ रुग्ण समोर आले आहेत. ज्या १३६ लोकांचा मृत्यू झाला आहे त्यात १३२ हुबेईमधील, तर हेइलोंगजियांग, शानदोंग, गुआंगदोंग आणि गुइझोऊमधील एकेक व्यक्ती मृत्युमुखी पडला आहे.
आयोगाने सांगितले की, ११८५ नवे संशयित रुग्ण समोर आले आहेत. मंगळवारी २३६ रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर होती, तर १८२४ रुग्णांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार ११,९७७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत १४,३७६ रुग्णांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या सहा आरोग्य कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मकाऊमध्ये १० आणि तैवानमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तैवानमध्ये याचे २२ रुग्ण समोर आले आहेत.हाँगकाँगमध्ये दुसरा बळीच्हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूमुळे एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे हाँगकाँगमधील कोरोना बळींची संख्या २ झाली आहे. प्रिंसेस मार्गारेट हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरू होते. १२ फेब्रुवारी रोजी या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६२ रुग्ण समोर आले आहेत.१४ दिवसांनंतर ५०० प्रवाशांची जहाजातून सुटकाच्जपानच्या योकोहामा बंदराबाहेर समुद्रात असलेल्या जहाजावरील ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आली आहे अशा ५०० जणांना जहाजातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली.च्त्यानंतर त्यांनी या जहाजाला ‘अलविदा’ केला. १४ दिवसांचा हा काळ प्रवाशांसाठी त्रासदायक होता. बस आणि अनेक टॅक्सीतून हे लोक आपल्या ठिकाणांकडे रवाना झाले.कंबोडियाच्या ‘वेस्टरडेम’मधूनही प्रवासी बाहेरकंबोडियाच्या वेस्टरडेम जहाजातूनही शेकडो प्रवासी आता बाहेर येत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेने हे लोक भयभीत होते. आठवडाभरानंतर ते आता मोकळा श्वास घेणार आहेत.