नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक नागरिकत्व आर्थिक सल्लागार फर्म आर्टन कॅपिटलने २०२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी पासपोर्ट निर्देशांक जारी केला आहे. या निर्देशांकात संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) पासपोर्टला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून पहिले स्थान देण्यात आले आहे. UAE पासपोर्टचा गतिशीलता स्कोअर १८० आहे आणि तो सर्वात शक्तिशाली प्रवास दस्तऐवज बनला आहे. UAE पासपोर्ट धारक १३० देशांमध्ये आधीच्या व्हिसाशिवाय आणि ५० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलसह प्रवास करू शकतात.
हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला मोठा दिलासा! कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींचे ट्विट, म्हणाले....
UAE पासपोर्ट इतका शक्तिशाली आहे की धारक १२३ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश करू शकतात. UAE ला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून संबोधत आर्टन कॅपिटल म्हणाले की UAE ने सकारात्मक मुत्सद्देगिरी स्वीकारली आहे, यामुळे त्यांचा पासपोर्ट इतका मजबूत झाला आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्ससह अनेक देश आहेत ज्यांचा मोबिलिटी स्कोअर १७८ आहे. म्हणजेच या देशांचे पासपोर्टधारक १७८ देशांमध्ये प्रवास करू शकतात. तिसर्या स्थानावर स्वीडन, फिनलंड, लक्झेंबर्ग, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड आहेत, ज्यांची गतिशीलता स्कोअर १७७ आहे.
आर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताच्या पासपोर्टची जागतिक क्रमवारी ६६ व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्टचा मोबिलिटी स्कोअर ७७ आहे, म्हणजे पासपोर्ट धारक ७७ देशांमध्ये प्रवास करू शकतात. भारतीय पासपोर्ट धारक २४ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश करू शकतात. त्याचबरोबर या यादीतील सर्वात खालच्या देशांमध्ये पाकिस्तानने आपले स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानी पासपोर्टला ४७ चा मोबिलिटी स्कोअर मिळाला आहे आणि तो जगातील पाचवा सर्वात कमी शक्तिशाली प्रवास दस्तऐवज बनला आहे. पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या लोकांना जगातील केवळ ११ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळू शकतो.
कशाचा आधारावर पासपोर्टचे रँक काढतात
देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे हे त्याच्या मोबिलिटी स्कोअरच्या आधारे ठरवले जाते. मोबिलिटी स्कोअर व्हिसा फ्री एंट्री, व्हिसा ऑन अरायव्हल, ई-व्हिसा यासारख्या घटकांचा विचार करतो. याचा अर्थ असा की पासपोर्टचा गतिशीलता स्कोअर जितका जास्त असेल तितका तो अधिक शक्तिशाली आहे. आर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्स १९३ देश आणि ६ युनायटेड नेशन्स प्रदेशांमधील १९९ पासपोर्टचे मूल्यमापन आणि क्रमवारी लावते. जे प्रदेश त्यांचे स्वतःचे पासपोर्ट जारी करत नाहीत ते मूल्यांकनामध्ये समाविष्ट केले जात नाहीत आणि त्यांना गंतव्यस्थान मानले जात नाही.