शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 5:22 PM

UAE Rain Storm, Weather Live Updates: वादळी वारा आणि पावसानंतर यूएई प्रशासनाने देशभरात ऑरेंज अलर्ट जारी, विमानसेवेवरही परिणाम

UAE Weather Live Updates: सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हवामानाने हाहा:कार माजवला आहे. गुरूवारी पुन्हा या विभागात जोरदार वादळासह पाऊस झाला. वादळी वारा आणि पावसानंतर यूएई प्रशासनाने देशभरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाल्याचे चित्र आहे. आज सकाळी UAE च्या लोकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेकांना कार्यालयात जाणे शक्य झाले नाही. शाळकरी मुलांनाही या पावसाचा फटका बसला. अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध पावसाच्या पाण्यात अडकल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसून आले.

आधीच दिला होता इशारा- काही दिवसांपूर्वी यूएईच्या हवामान खात्याने हवामान खराब होण्याचा इशारा दिला होता. 2 मे ते 3 मे पर्यंत हवामान खराब होण्याची शक्यता आहे. यूएई सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. शाळा आणि कंपन्यांना ऑनलाइन वर्ग घेण्यास आणि घरून काम करण्यास सांगितले आहे. उद्याने आणि समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. बस सेवा आणि विमान सेवांवरही परिणाम झाला आहे.

मध्यरात्रीपासून पाऊस सुरूच- नॅशनल सेंटर ऑफ मेट्रोलॉजी (एनएसएम) ने जारी केलेल्या अलर्टनुसार, मध्यरात्रीपासून देशात मुसळधार पाऊस पडत आहे. दुबईमध्ये पहाटे 2.35 वाजल्यापासून पाऊस आणि विजांचा कडकडाट झाल्याच्या बातम्या येत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसापेक्षा हा पाऊस कमी धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीज व इतर वितरण सेवाही प्रभावित- UAE च्या खाद्यपदार्थ आणि तत्सम डिलिव्हरी सेवांनी देखील विलंब होत आहे. रायडर्सच्या सुरक्षेचा विचार करून त्यांच्या ग्राहकांना डिलिव्हरीसाठी विलंबाची नोटीस जारी केली जात आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या सेवाही रद्द केल्या आहेत. तसेच वीज वितरणसेवेवरही याचा परिणाम दिसून आला आहे.

टॅग्स :United Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीsaudi arabiaसौदी अरेबियाRainपाऊसcycloneचक्रीवादळ