शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Corona Vaccination : ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 7:24 PM

Corona Vaccination : सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत झालेल्या ट्रायल दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनची लस सौम्य आणि तीव्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 72 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते.

लंडन : ब्रिटन सरकारने फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल शॉट लसीला शुक्रवारी मान्यता दिली. या निर्णयामुळे यूकेच्या यशस्वी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला आणखी बळकटी मिळेल. आता आमच्याजवळ चार सुरक्षित लस आहेत, ज्याद्वारे लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक म्हणाले. तसेच, सिंगल शॉट लशीमुळे येत्या काही महिन्यांत लसीकरणात मोठा फरक पडेल, असे सरकारचे म्हणणे आहे. (UK Approves Single Shot Johnson & Johnson Covid Vaccine)

ब्रिटनने या लसीच्या 2 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायल दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सनची लस सौम्य आणि तीव्र कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 72 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते. ब्रिटनने आतापर्यंत 6.2 कोटी लसीचे डोस लोकांना दिले आहेत. जास्तकरून डोस ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर या लसीचे आहेत. याशिवाय, मोडर्नाच्या लसीला देखील परवानगी देण्यात आली आहे.

(ब्रिटन ऑगस्टपर्यंत कोरोनामुक्त होणार, वॅक्सिन टास्कफोर्स प्रमुखांचा दावा)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. येथील रुग्णांमध्ये कोरोनाचा B1.617.2 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. B1.617.2 या व्हेरिएंटचे वाढते प्रकरण लक्षात घेता काही भागात पुन्हा निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर टीका सुरू झाली आहे. ब्रिटनने मंगळवारी विना-अनिवार्य प्रवासावर बंदी घालण्यासाठी आणि कोरोनाच्या B1.617.2 या व्हेरिएंटवर मात करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे येथील बोरिस जॉन्सन सरकारवर 'गोंधळ आणि अनिश्चितता' असल्याचा आरोप केला जात आहे.

कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावाब्रिटनमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी टोचण्यात येणार लस कोरोना व्हायरसच्या B1.617.2 व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यास कमी प्रभावी आहे, असा दावा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केला होता. ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंथनी हार्डेन म्हणाले होते की, देश अनलॉक करण्याच्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण कोरोनाचा हा व्हेरिएंट किती वेगाने प्रादुर्भाव होईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लस नवीन व्हेरिएंटच्या विरोधात कमी प्रभावी असू शकते असा दावाही त्यांनी केला होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसLondonलंडनcorona virusकोरोना वायरस बातम्या