नवी दिल्ली-
भारत (India) आणि ब्रिटनमध्ये (Britain) एक मोठा व्यापारी करार (Business Deal) होणार आहे. गेल्या महिन्यात जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच या डीलबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
"दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे, त्यावरून असं म्हणता येईल की भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement-FTA) दिवाळीपर्यंत पूर्णत्वास येऊ शकतो आणि अंतरिम कराराची कदाचित गरज भासणार नाही", असं ब्रिटन दौऱ्यावर असलेले भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये मोठे करारपियुष गोयल दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर लंडनमध्ये पोहोचले आहेत. जेथे ते FTA चर्चेच्या चौथ्या फेरीपूर्वी गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. हा संवाद १३ जून रोजी ब्रिटनमध्ये प्रस्तावित आहे. इंडिया ग्लोबल फोरमचा वार्षिक कार्यक्रम 'युक्रे-इंडिया वीक' २७ जूनपासून सुरू होत आहे. त्याआधी गुरुवारी संध्याकाळी आयोजित एका कार्यक्रमात गोयल यांनी ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातीशी वेगानं झालेल्या एटीएफचा उल्लेख केला. ते म्हणाले की गोष्टी योग्य दिशेने जात आहेत.
अनेक देशांसोबत एफटीएची तयारीमुक्त व्यापार करारासंबंधी अनेक देशांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती पीयुष गोयल यांनी यावेळी दिली. "कॅनडासोबत अंतरिम करारही केला जाणार आहे. ब्रिटनसोबत करारही झाला आहे. पण ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत, आम्हाला वाटतं की दिवाळीपर्यंत आमचा यूकेसोबत पूर्ण एफटीए करार अस्तित्वात येईल. याबाबत आम्ही बैठका घेत आहोत ज्या चांगल्या झाल्या आहेत", असं गोयल म्हणाले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर होते, त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये दिवाळीपर्यंत एफटीएची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती आणि आता या दिशेने वेगाने काम केले जात आहे ही महत्त्वाची बाब असल्याचेही ते म्हणाले.