अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) सरकार बनल्यानंतर आता पुन्हा साऱ्या जगावर पुन्हा मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली. आता पुन्हा अफगाणिस्तान दहशतवाद्यांचा मोठा गड बनू शकतो. यामुळे युकेच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखाने मोठा इशारा दिला आहे. पश्चिमी देशांमध्ये तालिबान आल्यानंतर अल कायदा स्टाईलचे दहशतवादी हल्ले वाढू शकतात, असा इशारा दिला आहे. (Terrorist Attack like 9/11 will rise in future because of Taliban Raj.)
एमआय ५ चे संचालक जनरल कॅन मॅकलम यांनी सांगितले की, तालिबानच्या येण्यामुळे युरोपला सर्वाधिक धोका उत्पन्न होऊ शकतो. कारण आता नाटोचे सैन्य अफगाणिस्तानातून गेले आहे. तिथे आता कोणतेही लोकशाहीचे सरकारही नाही. दहशतवादी कारवाया या रातोरात होत नाही, त्यासाठी ट्रेनिंग कॅम्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी वेळ जाईल.
गेल्या 10 वर्षांत अनेक ठिकाणी युकेमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत, जिथे दहशतवादी कोणत्या ना कोणत्या विचारधारेने प्रेरित होता. यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे. पुन्हा अल कायदा स्टाईलचे हल्ले होण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये ब्रिटनमध्ये भीषण हल्ला झाला होता. ट्रेन आणि बसमध्ये एकूण 52 लोकांचा आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला होता.
कॅन मॅकलम यांनी सांगितले की, 9/11 नंतर युकेमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. फरक एवढाच आहे की ही तीव्रता कमी आहे. मात्र, चाकू आणि बंदुकीच्या जोरावर अनेकांचा जीव घेतला जात आहे. हा इशारा जरी युरोपसाठी असला तरी अन्य देशांनीही सावध राहणे आवश्यक आहे.