ऋषी सुनक यांच्या आईने बनवलेली भारतीय बर्फी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींनी चाखली, Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:25 PM2023-06-19T13:25:04+5:302023-06-19T13:29:45+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुनक यांनी झेलेन्स्की यांना मिठाई खायला दिल्याचे दिसत आहे. ही बर्फी आईने भारतीय पद्धतीची बनवली असल्याचे सुनक सांगत आहेत. तसेच झेलेन्स्की भारतीय मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत या घटनेचा खुलासा केला आहे. माझ्या आईने भारतीय मिठाई बनवली, ज्यात स्वादिष्ट बर्फीही होती, असे सुनक या मुलाखतीत बोलताना दिसत आहेत. बर्फी माझी आई खूप छान बनवते. जे मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना खायला दिली. झेलेन्स्की यांना ती भारतीय गोड बर्फी खूप आवडली. ते खाल्ल्यानंतर त्यांनी खूप स्तुती केली.
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या; भारतासाठी मोस्ट वाँटेड
ऋषी सुनक पुढे सांगतात, तेव्हा आम्ही दोघे बोलत होतो. त्यामुळे झेलेन्स्की यांना भूक लागली होती. अशा परिस्थितीत मी आईच्या माध्यमातून त्यांना मिठाई भेट दिली. ऋषी सुनक यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये असे लिहिले आहे की, असं रोज होत नाही की,'वोलोडिमिर झेलेन्स्की तुमच्या आईच्या घरी बनवलेली मिठाई दररोज वापरून पाहतो असे नाही.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अलीकडेच त्यांच्या युरोपीय दौऱ्यात ब्रिटनला भेट दिली होती, तिथे त्यांनी रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनकडून नवीन शस्त्रे मिळवण्याबाबत चर्चा केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांची ही दुसरी यूके भेट होती. आपल्या भेटीदरम्यान झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे आभार मानले. 'आम्ही आभारी आहोत आणि येथे येणे माझ्यासाठी विशेषाधिकार आहे, असंही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
सुनक यांनी झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान सांगितले की, ब्रिटन युक्रेनला शेकडो हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि अतिरिक्त मानवरहित हवाई प्रणाली प्रदान करेल, जे येत्या काही महिन्यांत वितरित केले जातील. एवढेच नाही तर युक्रेनला दिल्या जाणाऱ्या नवीन शस्त्रांमध्ये २०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला असलेल्या ड्रोनचाही समावेश असल्याची घोषणा सुनक यांनी यावेळी केली.