इंग्लंडमध्ये (England Crime News) एक मर्डरर आणि गंभीर गुन्हेगार महिलेला प्रेमपत्र पाठवण्याच्या संशयावरून एका तुरूंग अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुरूष अधिकारी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या एका टीमचं नेतृत्व करतो आणि हाय-प्रोफाइल महिला तुरूंगात तो तैनात आहे. सहकाऱ्यांना समजलं की, ३८ वर्षीय व्यक्तीने कथितपणे शाउना होरे नावाच्या महिला कैद्याला पत्र लिहिले होते.
शाउना होरेने १६ वर्षीय बेकी वाट्सची हत्या केली होती. कोर्टाने होरेला हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं. तसेच तुरूंग अधिकाऱ्यावर आयएस-समर्थक सफिया शेखला लव्ह लेटर लिहिल्याचा आरोप आहे. सफिया शेखने सेंट पॉल कॅथेड्रल उडवण्याचा प्लॅन केला होता. अधिकाऱ्याला ११ ऑक्टोबरला बर्क्सच्या वोकिंगममध्ये त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं.
अटक करण्यात आलेला अधिकारी साधारण ८ वर्षापासून एंटी टेररिज्म सेलचं काम पाहत आहे. एका सूत्राने सांगितलं की, ते कैद्यांसोबत रिलेशनशिप बनवण्याचा प्रयत्न करत होता. २१ वर्षीय होरेला बिस्टलमध्ये बेकीला मारण्यासाठी २०१५ मध्ये १७ वर्षांची शिक्षा मिळाली. तर वेस्ट लंडनच्या ३८ वर्षीय शेखला गेल्यावर्षी जीवनदान मिळालं होतं.
पोलिसांनी सांगितलं की, ३८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याला सोडण्यात आलं. तुरूंग चालवणाऱ्या खाजगी कंपनी सोडेक्सोने सांगितलं की, हे प्रकरण पोलिसांकडे पाठवण्यात आलं आहे. याआधी एका अधिकाऱ्याने ३८ वर्षीय सीरिअल किलर जोआना डेनेहीला लव्ह लेटर लिहिलं होतं.