(प्रातिनिधिक छायाचित्र - business-standard.com)
तुमच्या खात्यात जर अचानक कुठून लाखो रूपये डिपॉझिट झाले तर विचार करा काय होईल. अर्थातच तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. ब्रिटनमध्ये (UK) मध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय Russell Alexander सोबत असंच झालं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, Russell Alexander चं Barclays बॅंकेत खातं आहे. त्यांच्या खात्यात एक दिवस अचानक १ लाख १० हजार पाउंड इतकी रक्कम जमा झाली. जेव्हा त्यांना खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज मिळाला तर त्यांना धक्का बसला. ते लगेच बॅंकेत गेले आणि याबाबत सांगितलं. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, ही रक्कम त्यांचीच आहे. त्यामुळे ते खर्च करू शकतात.
९ महिन्यांनी बॅंकेला कळाली चूक
साधारण ९ महिन्यांनंतर बॅंकेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी Russell Alexander कडून ती रक्कम परत घेतली. पण तोपर्यंत त्यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले होते. त्यामुळे बॅंकेने त्यांच्या खात्यातील ६ हजार पाउंडही जप्त केले.
Russell Alexander म्हणाले की, या घटनेनंतर ते रस्त्यावर आले. त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. ज्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. तिथे थंडीपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे हीटर आणि इतर सुविधाही नव्हत्या. Russell Alexander म्हणाले की, हे सगळं बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे झालं.
बॅंकेने त्यांचे पैसे जप्त केले
ते म्हणाले की, त्या बॅंकेचे ते ४० वर्षापासून ग्राहक आहेत. खात्यात अचानक इतकी मोठी रक्कम आल्याने त्यांनी बॅंकेला सूचनाही दिली होती. त्यानंतरही बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विश्वास दिला की, ही रक्कम त्यांचीच आहे. त्यानंतर त्यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले. नंतर बॅंकेने ती रक्कम परत मागत त्यांच्याकडील पैसेही जप्त केले.
ते पुढे म्हणाले की, बार्कले बॅंकेने त्यांच्या जीवनाच्या भावी योजना हिसकावून घेतल्या. आता त्यांना त्यांची रक्कम परत मिळवण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागेल. रसेलने बॅंकेच्या या बेजबाबदारपणामुळे त्यांच्या विरोधात केस ठोकली आहे. ज्यानंतर बॅंकेने त्यांना ५०० पाउंड नुकसान भरपाई देण्याची ऑफर दिली. पण ती त्यांनी स्वीकारली नाही.
कसा झाला खुलासा
यावर्षी सप्टेंबरमध्ये Russell Alexander यांच्या माजी बिझनेस पार्टनरने त्यांना संपर्क करून सांगितलं की, चुकून ती मोठी रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाली. त्यानंतर रसेल यांनी पुन्हा बॅंकेला संपर्क केला आणि या घटनेबाबत सांगितलं. मग बॅंकेने १ लाख १० हजार पाउंडची रक्कम रसेलच्या माजी बिझनेस पार्टनरच्या खात्यात ट्रान्सफर केली. तोपर्यंत रसेल यांनी त्यातील बरेच पैसे खर्च केले होते. त्यामुळे बॅंकेने त्यांचे ६ हजार पाउंड जप्त केले. यामुळे रसेल बॅंकेवर नाराज आहेत.