ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - इंग्लंड युरोपियन युनियनमध्ये रहाणार की, बाहेर पडणार यावर ऐतिहासिक मतदान सुरु असताना बाजार, गुंतवणूकदार आणि पंटर्सना ब्रिटन युरोपियन युनियनमध्येच रहाणार असा विश्वास आहे. यूनायटेड किंगडमने युरोपियन युनियनमध्ये रहावे कि, बाहेर पडावे या सोप्या प्रश्नाचे मतदारांना उत्तर द्यायचे आहे.
ब्रिटन बाहेर पडला तर, संसद अधिक सशक्त होईल आणि स्थलांतरावर नियंत्रण येईल असे लिव्ह कॅम्पेनच्या प्रचारकांचे म्हणणे आहे. रिमेन कॅम्पेनचे स्वत: पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन नेतृत्व करत असून, ईयूमध्ये ब्रिटन अधिक सुरक्षित आणि समृद्ध राहील असे त्यांचे मत आहे.
आणखी वाचा
मतदानपूर्व सर्वेक्षण चाचण्यांचा अटी-तटीचा सामना होईल असा अंदाज असला तरी, बाजाराला ब्रिटन युरोपियन युनियनमध्येच राहील असा विश्वास आहे. ब्रिटनच्या शेअर बाजाराचा इंडेक्स १.२ टक्क्यांनी वाढला होता तर, अन्य युरोपियन शेअर बाजाराचा निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढला आहे.
आणखी वाचा
सट्टाबाजार बेटफेअरने ८६ टक्के लोक रिमेनच्या बाजूने मतदान करतील आणि २५ टक्क्यापर्यंत लिव्हच्या बाजूने मत देतील असा अंदाज वर्तवला आहे.