युक्रेनचे चीफ ऑफ डिफेन्स इंटेलिजन्सचे मेजर जनरल कायरलो बुडानोव यांनी केलेल्या दाव्यानुसार रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्रपती राहणार नाहीत. व्लादिमीर पुतीन यांना राष्ट्रपती पदावरून हटवण्यासाठी रशियन अधिकारी सक्रिय पद्धतीनं चर्चा करत असल्याचा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
रशियाच्या ताब्यातील खेरसन बंदर पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न युक्रेननं सुरू केला असतानाच जनरल बुडानोव यांचं हे विधान समोर आलं आहे. पुतीन आता रशियाच्या सत्तेत राहतील असं आम्हाला वाटत नाही. कारण रशियात आता पुढील राष्ट्रपती कोण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे, असा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
क्रिमिया पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नक्रिमियाचे चीफ ऑफ डिफेन्स इंटेलिजन्सचे मेजर जनरल कायरलो बुडानोव यांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा खेरसन प्रांत परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. क्रिमिया देखील रशियाकडून परत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिमिया याआदी युक्रेनचाच भाग होता. पण २०१४ मध्ये रशियानं क्रिमियावर कब्जा केला होता.
सप्टेंबरमध्ये रशियाला मोठा धक्कागेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात सप्टेंबर महिन्यात रशियाला युक्रेनविरोधात मोठा फटका बसला. युक्रेनच्या सैन्याच्या विरोधात मोठ्या पराभवाचा सामना रशियाला करावा लागला. त्यानंतर पुतीन यांना व्लादिमीर पुतीन यांना तीन लाख आरक्षित सैनिकांच्या तैनातीची घोषणा करावी लागली होती. रशिया आपल्या संरक्षणासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो असा इशारा पुतीन यांनी दिला होता.