स्लोव्हयान्स्क : युक्रेनच्या स्लोव्हयान्स्क शहराजवळ रशिया समर्थक बंडखोर व सैनिकांत तुफान गोळीबार सुरू असतानाच लष्करी हेलिकॉप्टरवर हल्ला करून ते पाडण्यात आले. यात एका जनरलसह १२ सैनिक ठार झाले. हे हेलिकॉप्टर शहरावर उडत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष ओलेकसेंद्र तुर्चिनोव्ह यांनी संसदेत याची माहिती दिली. ते म्हणाले, बंडखोरांनी हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला. मृतांत जनरल सरही कुलचितस्की यांचा समावेश आहे. स्लोव्हयान्स्क शहर बंडखोर व सैनिकांतील धुमश्चक्रीचे केंद्र बनले आहे. या शहराच्या निवासी भागांत सरकारी दले तोफगोळ्यांचा मारा करत आहेत. (वृत्तसंस्था)
युक्रेनचे लष्करी हेलिकॉप्टर पाडले, १२ ठार
By admin | Published: May 30, 2014 3:24 AM