"पुतिन लवकरच मरणार अन्..."; युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:26 IST2025-03-27T13:24:49+5:302025-03-27T13:26:09+5:30
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरणार आहेत, अेस झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

"पुतिन लवकरच मरणार अन्..."; युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा मोठा दावा!
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला तीन वर्षांहूनही अधिक काळ लोटला आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरणार आहेत, अेस झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ते पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते. झेलेन्स्की म्हणाले, "पुतिन लवकरच मरणार, ही वस्तुस्थिती आहे. याच बरोबर, सर्वकाही संपुष्टात येईल."
पुतिन खरोखरच आजारी आहेत? -
गेल्या काही वर्षांपासून व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंदर्भात विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. द सनने दिलेल्या एका वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून पुतिन यांचा चेहरा अनेवेळा सुजलेला दिसून आला. याशिवाय, सार्वजनिक सभांमध्ये ते अनेक वेळा खुर्चीला धरून बसलेले दिसले. त्यांचे त्यांच्या शरीरावरील नियंत्रण कमी झाल्याचेही दिसून आले आहे. काही वृत्तांमधून तर, ते कर्करोग आणि पार्किन्सनसारख्या गंभीर आजारांचा सामना करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
राजकीय मानसिक हल्ला? -
झेलेन्स्की यांचे हे विधान केवळ एक आरोग्य विषयक वक्तव्यच नाही, तर एक राजकीय मानसिक हल्ला देखील मानला जात आहे. त्यांचे हे विधान म्हणजे, पुतिन यांच्यावर दबाव वाढविण्याच्या दृष्टीने खेळलेली एक चालही असू शकते.
खरे तर, पुतिन यांच्या आजारपणासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, आता युक्रेन रशियाला कमकुवत मानत असल्याचे झेलेन्स्की यांच्या विधानावरून दिसते. वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे पुतीन यांच्या संदर्भातील हे विधान आश्चर्यचकित करणारे असले तरी, ते रशियावर मानसिक आणि राजकीय दबाव वाढविण्याचा एक भाग असल्याचेही दिसते.