युक्रेनने भारताविरोधात पाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविलेली; 44 टँक परत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:18 PM2023-03-21T14:18:08+5:302023-03-21T14:19:24+5:30
आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता रशिया गहू पुरवत आहे. परंतू पाकिस्तान याच रशियाच्या विरोधात युक्रेनला युक्रेननेच दिलेले रणगाडे देणार आहे.
कोण कुठला देश आपल्या फायद्यासाठी कधी काय करेल याचा नेम नाही. आज युक्रेनवरून रशियावर दबाव टाकण्यासाठी, तसेच रशियाविरोधात उघड भूमिका मांडण्यासाठी भारतावर अमेरिकेसह युरोपीय देश दबाव टाकत आहेत. रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत करत आहेत. आज युक्रेनला याच देशांच्या शस्त्रांची गरज आहे. परंतू याच युक्रेनने एकेकाळी भारताविरोधातपाकिस्तानला रणगाडे, शस्त्रास्त्रे पुरविली होती.
आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता रशिया गहू पुरवत आहे. परंतू पाकिस्तान याच रशियाच्या विरोधात युक्रेनला युक्रेननेच दिलेले रणगाडे देणार आहे. पाकिस्तानने भारताविरोधात लढण्यासाठी या रणगाड्यांची खरेदी केलेली होती. आता हे रणगाडे युक्रेनला परत देऊन त्यांचा वापर रशियाविरोधात केला जाणार आहे.
ॉयुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील भारताला रशियाविरोधात भूमिका घेत नसल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. परंतू, त्यांच्याच देशाने पाकिस्तानला T-80UD हे रणगाडे दिले होते. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने १९९१ ते २०२० या काळात युक्रेनसोबत 1.6 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र खरेदी केली होती. यातच ३२० रणगाडे खरेदी देखील होते. हे पाकिस्तानचे मुख्य रणगाडे आहेत. तेच पाकिस्तानने भारताविरोधात युद्धात वापरले होते.
पाकिस्तानी सैन्याकडे एकूण 2467 रणगाडे आहेत. सोव्हिएतच्या T-80 रणगाड्याचे अपग्रेड व्हर्जन युक्रेनने पाकिस्तानला दिले होते. याचबरोबर २०२१ मध्ये पाकिस्तानने युक्रेनसोबत या रणगाड्यांची देखरेख, दारुगोळा आणि मिलिट्री ट्रेनिंगसह सैन्य उत्पादनांची निर्मितीसाठी ८५ दशलक्ष डॉलरची मोठी डील केली होती.
पाकिस्तानला युरोपीय देश आर्थिक मदत करणार आहेत. परंतू त्यासाठी युक्रेनला युद्धात मदत करावी लागणार आहे. यामुळे पाकिस्तान गहू आणि कच्चे तेल रशियाकडून घेऊन रशिय़ाविरोधात लढण्यासाठी ४४ रणगाडे पाठवित आहे. तसेच यापूर्वीही १६२ कंटेनर भरून दारुगोळा पाठविण्यात आला आहे. हा दारुगोळा ब्रिटन आणि अमेरिकेच्या जहाजांमधून पाठविला जात आहे.