शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Russia-Ukraine Crisis: युद्धासाठी अमेरिका तैयार, जापानमध्ये तैनात केली F-35A लढाऊ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 9:54 PM

रशियाला चीन किंवा उत्तर कोरियाकडून मदत मिळू नये, यासाठी अमेरिकेने जापानमध्ये लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

सियोल: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रशियाविरोधात युक्रेनच्या पाठिशी अनेक देश असल्याने जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. यातच अमेरिकेने अमेरिकेने(America) कुठल्याही रडारला चकवा देणारे F-35A(F-35A Fighter Planes) लढाऊ विमानाची जापानमध्ये तैनाती केली आहे. युद्ध झाल्यावर रशियाला चीन(China) किंवा उत्तर कोरियाची (North Korea)  मदत मिळू नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

कडेना हवाई तळावर विमानाची तैनाती यूएस इंडो-पॅसिफिक कमांडने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलास्का येथील 354 व्या फायटर ब्रँचचे F-35A विमान रविवारी हवाई मोहिमेसाठी आले होते. यासाठी ओकिनावाच्या कडेना हवाई तळावर विमानाची तैनाती करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चार B-52 आण्विक-सक्षम बॉम्बर लाँच करण्यात आले होते, योनहाप न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले. त्यानंतर आता ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.

9 चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीतएका बाजूला रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू असताना दुसरीकडे चीननं संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने आपली लढाऊ विमाने तैवानच्या दिशेने पाठवली आहेत. चीन आणि तैवान यांच्यातला संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. चीनने अनेकदा तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच महिन्यात चीनच्या विमानांनी 12 वेळा तैवानवर अतिक्रमण केले. आता पुन्हा एकदा चीनची 9 लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत दिसली आहेत. 

युद्धाला सुरुवातरशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश करुन बॉम्बवर्षावाने अनेक शहरांना हादरवले. युक्रेनने रशियाची 6 विमाने पाडली आहेत. रशियाचे 50 सैनिक ठार झाले आहेत, तर युक्रेनचे 40 सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनचे लष्करी विमान क्यिवजवळ कोसळलं आहे, यात 14 जण होते.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJapanजपानnorth koreaउत्तर कोरिया